कोरोना व्हायरसबाबत विधान परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण माहिती!

कोरोना व्हायरसबाबत विधान परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपेंची महत्त्वपूर्ण माहिती!

मुंबई – कोरोना व्हायरसबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना व्हायरस बाधित रूग्णांवर किंवा संशयित उपचार सर्व जिल्हा रुग्णालयात किमान 10 बेडचा वेगळा कक्ष करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच करोना व्हायरसच्या समस्येबाबत 104 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच कोरोना व्हायरसशी संबंधित पुणे इथे नियंत्रण कक्ष स्थापन केला असून संबंधितांना 020 – 617294 या नंबरवर कॉल करावा असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल मी सायबर क्राईमचे प्रमुख यांच्याशी बोललो आहे. करोना व्हायरसबाबात जे सोशल मीडियाच्या अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी सूचना केली असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच ट्रिपल लेयर, N -95 मास्क हे रुग्णालयाशी संबंधित मास्क आहेत, जे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. कोरोना व्हायरसशी संबंधित जी लोकं विविध मास्कची साठेबाजी, अनिर्बंध किंमतीने विक्री करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
व्हायरस बाधित रुग्णांनी मास्क लावावेत, किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांनी वापरावेत, सर्वसामान्यांनी मास्क लावण्याची गरज नाही, स्वच्छ रुमालचा वापर करावा, हँडशेक टाळावा असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS