… जेव्हा मंत्री रस्त्यावर उतरून  वाहतूक कोंडी सोडवतात

… जेव्हा मंत्री रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी सोडवतात

नाशिक – मंत्री दौऱ्यावर येणार असतील त्या दिवशी रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. या पोलीस प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र, एखाद्या वेळी मंत्रीच जर वाहतूक कोंडीत आडकला तर काय होते. मंत्र्यासाठी थोड्या अंतरावर दुसऱ्या गाडी सोय केली जाते. नागरिक वाहतूक कोंडी अडकून बसतात. पण त्याला काही मंत्री अपवाद असतात. त्यांना स्वतःसह इतरांना या वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेतात. याच प्रयत्य शुक्रवारी नाशिककरांना आला.

मुंबई- नाशिक महामार्गावरुन जात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या वाहतूक कोंडीचा सामना केला. मुंबईहून नाशिकला निघालं असताना त्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. भुजबळ यांच्या वाहनांचा ताफा ज्यावेळी घोटी टोल नाक्यापाशी आलं तेव्हा अशीच काहीशी परिस्थिती उदभवली. ज्यानंतर त्यांनी स्वत: वाहनातून खाली उतरत त्या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक वाहनांना विना टोल जाऊ देत त्यांनी हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी आणि इतर अनेकांसाठीच त्यांचं हे रुप काहीसं थक्कं करणारं होतं. खुद्द भुजबळ इथं वाहतूक कोंडी सोडवत असल्याचं लक्षात येताच त्यांच्यावर काही कॅमेरेही रोखले होते.

 

COMMENTS