मान्यता नसतानाही उभारतोय मंत्रिमहोदयांचा कारखाना ?

मान्यता नसतानाही उभारतोय मंत्रिमहोदयांचा कारखाना ?

अहमदनगर – खासगी साखर कारखाना उभारण्यासाठी मंत्र्याकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचं समोर आलं आहे. विजय शिवतारेंचा हा कारखाना असून या कारखान्याला ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे, ना साखर आयुक्तांची परवानगी आहे तरीही परवानगी मिळण्याअगोदरच या कारखान्याच्या कामाला सुरुवात केली असल्याला आरोप येथील गावकऱ्यांनी केला आहे. ‘स्वामी समर्थ शुगर अॅन्ड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड’ असं या कारखान्याचं नाव असून माळेवाडी दुमाला या गावात हा कारखाना उभारला जात आहे.

केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयानं २०१० साली शिवतारेंच्या कारखान्याला आईएम प्रमाणपत्र दिलं होतं परंतु या प्रमाणपत्राचीही मुदत संपली आहे. आयईएम मिळाल्यानंतर सात वर्षांत कारखान्याची उभारणी करणं बंधनकारक असतं परंतु शिवतारेंच्या आयईएमची मुदत सप्टेंबर २०१७ मध्येच संपली आहे. तरीही या कारखान्याचं काम जोरात सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे आयईएमनुसार, ज्या जागेवर कारखाना उभारायचा त्याऐवजी दुसऱ्याच जागी कारखान्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ‘आयईएम’नुसार शिवतारेंचा कारखाना वरखेड येथील रामडोह येथे गट नंबर ५७ वर उभा राहायला हवा होता परंतु प्रत्यक्षात तो माळेवाडी दुमाला या गावात उभारला जात आहे. तसेच शिवतारेंच्या कारखान्याला कोणत्याच विभागाची मान्यता नसली तरीही हा कारखाना उभारला जात असल्यामुळे विजय शिवतारेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS