राष्ट्रवादीत कलाकारांची आवक वाढली, अभिनेत्री प्रिया बेर्डेंपाठोपाठ ‘हे’ ज्येष्ठ कलाकार हातावर बांधणार घड्याळ!

राष्ट्रवादीत कलाकारांची आवक वाढली, अभिनेत्री प्रिया बेर्डेंपाठोपाठ ‘हे’ ज्येष्ठ कलाकार हातावर बांधणार घड्याळ!

मुंबई – अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यापाठोपाठ प्रख्यात चित्रपट अभिनेत्री सविता मालपेकर या देखील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रिया बेर्डे यांच्यासह कलाकारांच्या फौजेने पुण्यात जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यानंतर आता अभिनेत्री सविता मालपेकर या देखील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. त्यामुळे कलाकारांची आवक राष्ट्रवादीत वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS