मराठा आरक्षणाबाबत आज बैठकांचं सत्र !

मराठा आरक्षणाबाबत आज बैठकांचं सत्र !

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. सह्याद्री अतिथीग्रहावर ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधिशांकडे 4 अर्ज केले आहेत. मात्र त्याबाबत सुनावणी होत ऩसल्याने सरकारसमोरील अडचणी वाढत आहेत.
या बैठकीनंतर संध्याकाळी वर्षा निवासस्थानी दुसरी बैठक होणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे. मराठा संघटनांचे प्रतिनिधीही या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि इतर काही मंत्रीही या बैठकीला हजेरी लावणार आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आज मराठा आरक्षणाविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टात स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. नोकरी भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक प्रवेश यामध्ये मराठा समाजाच्या जागा वगळून भरती प्रक्रिया सुरू करावी अशी काही मराठा संघटनांची मागणी आहे.

COMMENTS