मुलांना शिक्षण देऊनही आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, चिठ्ठी लिहून मराठा शिक्षकाची आत्महत्या !

मुलांना शिक्षण देऊनही आरक्षण नसल्यामुळे नोकरी नाही, चिठ्ठी लिहून मराठा शिक्षकाची आत्महत्या !

लातूर – मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीवरुन गेली काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरु आहे. काही मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागणीवरुन आत्महत्या केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. आरक्षण दिलं जाईल आपला जीव गमाऊ नका असं सरकारकडून वारंवार अवाहन केलं जात आहे. परंतु तरीही राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. आज लातूरमधील एका शिक्षकानं आत्महत्या केली आहे. तालुक्यातील माटेफळ येथे शिक्षक रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या मुलांना शिक्षण देऊनही त्यांना नोकरी लागत नसल्यामुळे रमेश पाटील यांनी आत्महत्या केली आहे.

दरम्यान रमेश पाटील यांचा मोठा मुलगा अजित याने बीए. डीएड 2011 साली पुर्ण केले आहे. तर लहान मुलीने इंजिनिअरींग पुर्ण केली आहे. परंतु एवढ शिक्षण घेऊनही त्यांना नोकरी नसल्यामुळे दोघेही घरीच आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या रमेश पाटील यांनी आत्महत्या केली आहे.

COMMENTS