मराठा समाज आक्रमक, राज्य सरकारचा निषेध, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन! पाहा

मराठा समाज आक्रमक, राज्य सरकारचा निषेध, मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन! पाहा

मुंबई – आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झाला असून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच सरकारनं जाहीर केलेली भर्ती रद्द करण्याची मागणीही मराठा समाजानं केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून जवळपास १८ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व नियमांचं पालन करून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. मुंबई लगतच्या शहरांमध्ये देखील एकाचवेळी ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे.

 

COMMENTS