ब्रेकिंग न्यूज – मराठा आरक्षणाबाबत या दिवशी सुनावणी

ब्रेकिंग न्यूज – मराठा आरक्षणाबाबत या दिवशी सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये आरोप केले जात होते. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी ट्विट करून येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती दिली.

एसईबीसी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापिठाची स्थापना होऊन आठ ते दहा दिवसात सुनावणी होण्याची अपेक्षा होती. त्यासाठी राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळले आहे. अशोक चव्हाण यांनी माहिती देत असताना सदस्यीय घटनापीठापुढे ही महत्त्वाची सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार आहे.

मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने यासाठी 4 वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. त्यानंतर ही सुनावणी होत आहे.

अंतरिम स्थगितीनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर पोलीस मेगाभरतीसह तलाठीपदाच्या नियुक्त्या देखील रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.

 

COMMENTS