निवडणूक तोंडावर आली असताना राज्यमंत्र्यांना सन्मान देण्याचा सरकारचा प्रयत्न !

निवडणूक तोंडावर आली असताना राज्यमंत्र्यांना सन्मान देण्याचा सरकारचा प्रयत्न !

मुंबई – निवडणूक तोंडावर आली असताना राज्यमंत्र्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न भाजप सरकारनं केला आहे. मंत्री परिषद बैठकी घेऊन राज्यमंत्र्यांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं दिसत आहे. राज्यात 2 वर्षानंतर उद्या मंत्री परिषदेची बैठक पार पडणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीला केवळ कॅबिनेट मंत्री हजर असतात, राज्यमंत्री कॅबिनेट बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे राज्यमंत्र्यांचा सहभाग आसलेली मंत्री परिषदेची बैठक राज्यात होते.  दर महिन्याला चौथ्या मंगळवारी मंत्री परिषद बैठक घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

दरम्यान भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत केवळ तीन मंत्री परिषदेच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सरकारला चार वर्ष होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर मंत्री परिषद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्री परिषदेची बैठक घेऊन या मंत्र्यांना सरकारकडून खूश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS