सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, पक्षातील पदाधिका-यांनी दिले राजीनामा ?

सिंधुदुर्गात नारायण राणेंना धक्का, पक्षातील पदाधिका-यांनी दिले राजीनामा ?

सिंधुदुर्ग, सावंतवाडी – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गमध्ये धक्का बसला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणे यांच्या जवळच्या व्यक्तींनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती आहे. कुडाळ तालुक्यातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती आहे.

दरम्यान राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याने नाराज कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे राणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कुडाळकर, दादा साईल आणि दीपक नारकर  अशी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. नारायण राणे हे पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे या पदाधिका-यांनी राजीनामे दिले असल्याचं बोललं जात आहे. परंतु आपण काँग्रेसमध्ये पुन्हा जाणार नसल्याचं राणे यांनी जाहीर केलं आहे.

 

COMMENTS