राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!

राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला!

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती.
या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आज मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

कोविड 19 चा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत लॉकडाऊनची स्थिती वाढवणं गरजेचं असल्याचंही अजॉय मेहता यांनी या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

COMMENTS