ठाकरे सरकारमध्ये २३ जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व, १३ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित  !

ठाकरे सरकारमध्ये २३ जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व, १३ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित !

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारावरुन ठाकरे सरकारमध्ये २३ जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व तर १३ जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व नसल्याचं दिसत आहे. ठाकरे सरकारमध्ये मुंबईतले ७ मंत्री, तर पुणे, नागपूर, कोल्हापूर, अहमदनगरला प्रत्येकी ४ मंत्री मिळाले आहेत. तसेच ७ जिल्ह्यांना प्रत्येकी २ मंत्रीपदे तर १० जिल्ह्यांना प्रत्येकी १ मंत्रीपद देण्यात आलं आहे.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर – ७
पुणे – ३
नागपूर – ३
कोल्हापूर – ३
अहमदनगर – ३
सांगली – २
सातारा – २
लातूर – २
औरंगाबाद – २
अमरावती – २
ठाणे – २
नाशिक – २
जालना – १
बुलढाणा – १
चंद्रपूर – १
बीड – १
रत्नागिरी – १
यवतमाळ – १
नांदेड – १
रायगड – १
लातूर – १
नंदूरबार – १

दरम्यान राज्यातील तब्बल तेरा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे. यात पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. विदर्भातील अकोला, वर्धा, वाशिम, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तर मराठवाडयातील उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे.

COMMENTS