मी ब्रह्मचारी आहे, देवाच्या साक्षीने सांगतो… महादेव जानकरांचं धक्कादायक विधान!

मी ब्रह्मचारी आहे, देवाच्या साक्षीने सांगतो… महादेव जानकरांचं धक्कादायक विधान!

पुणे – राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे. “मी ब्रह्मचारी आहे. देवाच्या साक्षीने सांगतो. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून आले आहेत. फक्त मताधिक्य किती देताय ते सांगा,अस वक्तव्य जानकर यांनी केलं आहे. त्यामुळे महादेव जानकर अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
शिरुर विधानसभा क्षेत्रात रांजणगाव येथील सभेत ते बोलत होते.

तसेच यावेळी जानकर यांनी राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली आहे. एका देशात दोन पंतप्रधान तुम्हाला मान्य आहे का? संविधान आणि तिरंगा जाळला त्यावर गुन्हा दाखल करु नये? हे ही मान्य आहे का? मग शरद पवारांच्या पक्षाला कसं काय मान्य आहे. त्यांचं डोकं फिरलंय का? अशी टीका जानकरांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा संपणारा पक्ष आहे. घराघरात भांडणं लावणं आणि जातीजातीत तेढ निर्माण करण्याचं पाप यांनी केलं असल्याचा आरोपही यावेळी जानकरांनी केला आहे.

COMMENTS