मध्य प्रदेशात काँग्रेसला मिळणार सत्ता, भाजप पिछाडीवर – एक्झिट पोल

मध्य प्रदेशात काँग्रेसला मिळणार सत्ता, भाजप पिछाडीवर – एक्झिट पोल

नवी दिल्ली – राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोराम, तेलंगणा आणि छत्तीसगड या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकांचे एक्झिट पोल हाती आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 94 जगा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तर याठिकाणी काँग्रेस  असणार असल्याची शक्यता या पोलमध्ये वर्तवली आहे. काँग्रेसला एकूण 126 जागा मिळती असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसला बहूमत मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान मध्यप्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून राज्यात भाजपाची सत्ता आहे. सलग चौथ्यांदा मध्य प्रदेश जिंकण्यासाठी भाजपनं मोठे  प्रयत्न केले होते. तर सरकारविरोधात मतदारांमध्ये असलेल्या नाराजीचा फायदा उठवून, भाजपाकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. एक्झिट पोलनुसार याठिकाणी भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS