राष्ट्रवादीला धक्का, विद्यमान खासदार भाजपच्या वाटेवर, ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी?

राष्ट्रवादीला धक्का, विद्यमान खासदार भाजपच्या वाटेवर, ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी?

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. माढ्यातील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. भाजपकडून आज माढा मतदारसंघासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांची उमेदवार जाहीर केली जाणार आहे.  या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते पाटीलांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान भाजपकडून माढा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव मागे पडलं. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे माढाचा भाजपचा उमेदवार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. विजयसिंह मोहिते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तर माढ्यात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचं आव्हान असणार आहे.

COMMENTS