लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी, नाना पटोलेंसह ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी, नाना पटोलेंसह ‘यांना’ उमेदवारी निश्चित ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काही उमेदवारांची पहिली यादी कालच जाहीर केली आहे. त्यानंतर आता दुसरी यादी तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेसची छाननी समितीची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत काही उमेदवारांची नावे निश्चित केली असल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले नाना पटोले यांना नागपूरातून उमेदवारी दिली जाणार असून छाननी समितीसमोर होकार दिला आहे. त्यामुळे नागपुरात भाजपचे विद्यमान खासदार आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले हे उमेदवार असणार आहेत.

दरम्यान नाना पटोले यांनी नागपूरमधून निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून  छाननी समितीकडून आज मला नागपूर संदर्भात विचारणा करण्यात आली. नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढण्यास मी होकार दिला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी बोलणे झाले असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत राज्यातील काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे. सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, रामटेकमधून मुकुल वासनिक,  यवतमाळमधून  माणिकराव ठाकरे,
नांदेडमधून अमिता चव्हाण, दक्षिण मुंबईतून  मिलिंद देवरा यांची नावं निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS