घटस्थापनेच्या दिवशी भूमिका करणार जाहीर – नारायण राणे

घटस्थापनेच्या दिवशी भूमिका करणार जाहीर – नारायण राणे

सिंधुदुर्ग -नारायण राणे काय भूमिका घेणार याकडे आज संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल होते. मात्र मी टप्प्याटप्प्याने ब्रेकिंग न्यूज देणार आहे. 21 सप्टेंबरला घटस्थापने दिवशी  पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडणार, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

’21 तारखेला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी पुढची राजकीय दिशा कशी असेल याची घोषणा कुडाळमध्ये करणार आहे, पितृपक्षात नको.’  असे राणे नारायण राणे यांनी आज कुडाळ येथे झालेल्या सभेत स्पष्ट केले आहे.

‘मला डिलवचले की माझी ताकद दुप्पट होते. अशोक चव्हांनांनी मला डिवचू नये. त्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त केली ती नियमबाह्य अाहे. त्यात त्यांनी मला एकदाही विचरले नाही. कोकणात काँग्रेसला मी वाढवले आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्ष बदलण्याचा अधिकार फक्त मला आहे, असे आव्हान त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांना केले.

जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या निर्णयावरही राणे यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेतृत्वाने मला न विचारता कार्यकारिणी बरखास्त केली. दत्ता सामंत यांना नोटीस दिली नाही. मला विचारलं नाही, आमदारांना विचारलं नाही, याला लोकशाही म्हणायची का. असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

नारायण राणेंपूर्वी नितेश राणेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आमदार नितेश राणेंनी हुसेन दलवाई यांच्यावर जोरदार टीका केली. हुसेन दलवाई की हलवाई आहे हे माहित नाही असे चिमटा काढत नितेश राणे म्हणाले, विकास सावंत, हुसेन दलवाई यांना आमच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही. नितेश राणेंनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. महाराष्ट्रात नारायण राणेंना ओळखले जाते. अशा नेत्याच्या मागे उभे राहावे असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले की,  सिंधुदुर्गातील कार्यकारिणी बदलली, पण आम्ही रत्नागिरीसाठी अध्यक्ष मागतोय तो दिला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही राज्यात काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव जिल्हापरिषद आहे. मग इथे सर्व सत्तास्थाने होती तर इकडे का बदल केलात, असा सवाल निलेश राणेंनी केला. तसेच शिवसेनेचे अस्तित्व संपवून 2019 मध्ये नवस फेडणार असल्याची गर्जनाही त्यांनी केली.

दरम्यान, आता 21 तारखेला  नारायण राणे काँग्रेसला रामराम करत भाजपात जाणार का ? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.

 

 

COMMENTS