गद्दारांना धडा शिकवण्यासाठी बहूजन विकास आघाडीलाही सोबत घेणार  -जितेंद्र आव्हाड

गद्दारांना धडा शिकवण्यासाठी बहूजन विकास आघाडीलाही सोबत घेणार -जितेंद्र आव्हाड

मुंबई  कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणूक अत्यंत चुरशीची होत चालली असल्याचं दिसून येत आहे.   या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार सामना रंगला असल्याचं दिसून येत आहे. भाजपमध्ये गेलेले निरंजन डावखरे यांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस,राष्ट्रवादी, शेकाप एकत्र येणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गद्दाराला धडा शिकवण्याची भूमिका आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजन विकास आघाडीकडेही पाठिंबा मागितला आहे. डावखरे आणि हितेंद्र ठाकूर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण तरीही हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरु केली असून हितेंद्र ठाकूर यांनी भाजप उमेदवाराला म्हणजेच निरंजन डावखरेंना मदत करु नये, राष्ट्रवादीला करावी” असं आवाहन केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निरंजन डावखरे यांच्याविरोधात ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. तसेच निरंजन डावखरेंची पक्ष सोडण्याची तयारी एक वर्ष आधीपासूनच सुरु होती. म्हणून राष्ट्रवादीच्या मतदारांना निरंजन डावखरेंनी मतदार म्हणून नोंदणी करु दिली नाही. पण कमी दिवस असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस मेहनत करुन गद्दारांना धडा शिकवावा असं कार्यकर्त्यांना वाटत असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS