निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात !

निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात !

मुंबईकोकण पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहे. भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरेंना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे डावखरेंविरोधात मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीच्या रणनीतीसाठी  उद्या पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला स्वतः शरद पवार संबोधित करणार आहेत. नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक,जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने तयारी सुरु केली असल्याचं यावरुन दिसत आहे. या निवडणुकीसाठी निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नजीब मुल्ला यांना विजयी करण्यासाठी आता राष्ट्रवादीने निकराचे प्रयत्न सुरु केले असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. या निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे.

COMMENTS