भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी ‘यांना’ देणार उमेदवारी ?

भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरेंविरोधात राष्ट्रवादी ‘यांना’ देणार उमेदवारी ?

मुंबई – कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष तयारीला लागले असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी 25 जूनला मतदान होणार आहे, तर 28 जूनला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार लढत होणार असून शिवसेनाही भाजपविरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीला जोरदार रंगत येणार असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेल्या निरंजन डावखरेंसमोर राष्ट्रवादी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादीचे नेते नजिब मुल्ला यांचं नाव चर्चेत आहे. नजिब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे नजिब मुल्ला यांना उमेदवारी दिली तर याठिकाणी चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच नजीब मुल्ला यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी असल्यामुळे या घोषणेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान स्थानिक राजकारणात जितेंद्र आव्हाडांमुळे डावखरे पिता पुत्र नाराज होते. त्यामुळे निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. तसेच 6 जून 2016 रोजी विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे पडले. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाने मदत न केल्यामुळे वसंत डावखरे नाराज होते.

COMMENTS