कोकणात राष्ट्रवादीला धक्का, सुनील तटकरेंचे कट्टर समर्थक शिवसेनेत!

कोकणात राष्ट्रवादीला धक्का, सुनील तटकरेंचे कट्टर समर्थक शिवसेनेत!

रायगड – कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनी आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रघुवीर देशमुख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. कट्टर समर्थकानेच शिवसेनेत प्रवेश केल्याने सुनील तटकरे मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान रघुवीर देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. माधवी देशमुख, राज देशमुख, रोहन देशमुख यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे.

विकासकामांना चालना देण्यासाठी आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे. पण त्याचवेळी खासदार सुनील तटकरे यांच्या परिवाराविषयी आपल्याला आदर असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या महाड तालुक्यातील ढालकाठी येथील शिवनेरी या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे रायगडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार भरतशेठ गोगावले यांचे पारडे जड होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS