राष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश !

राष्ट्रवादी काँग्रेसला केरळमध्ये दोन जागांवर यश !

केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीने सलग दुस-यांदा मोठा विजय मिळवला आहे. पी विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनंही केरळमध्ये तीन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं आहे. तर एका ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला असला तरी केरळमध्ये पक्षाला यश आले आहे.
एलाथुरा (ELATHUR) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानं मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे ए के शशीधरन यांना 57598 मते मिळाली. त्यांनी अपक्ष उमेदवाराचा तब्बल 26 हजार मतांनी पराभव केला. या ठिकाणी भाजपचा उमेदवार तिस-या क्रमांकवर फेकला गेला. तर कुट्टानंद (KUTTANAD) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसचे के थॉमस हे जवळपास 7 हजार मतांनी विजयी झाले आहेत. थॉमस यांनी केरळ कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर कोट्टकल मतदारसंघात (KOTTAKKAL) राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. इंडियन मुस्लिम लीगच्या उमेदवाराने राष्ट्रवादीला हरवलं. इंडियन मुस्लिम लिगच्या उमेदवाराला 80 हजार तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 63 हजार मते मिळाली.

COMMENTS