येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, विधानसभेत 218 आमदारांची उपस्थिती !

येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, विधानसभेत 218 आमदारांची उपस्थिती !

बंगळुरु – कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा असून आज दुपारी 4 वाजता त्यांना बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे भाजप बहूमत सिद्ध करणार का याकडे लक्ष लागलं असून 224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका असून भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. तर काँग्रेस-जेडीएसकडे एकूण 116 आमदारांचं बळ आहे.

दरम्यान आज विधानसभेत एकूण 218 आमदारांनी उपस्थिती लावली असून जेडीएसचे दोन आमदार अजूनही गैरहजर आहेत. तसेच काँग्रेसचे दोन आमदार अजूनही अनुपस्थित असल्याची माहिती आहे. तसेच बहुमतचाचणी पूर्वी सभागृहात आमदारांचा शपथविधी सुरु, मात्र काँग्रेसचे 2 आमदार अजूनही पोहोचले नाहीत, येडियुरप्पांचे निकटवर्तीय काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील नॉट रिचेबल असल्याची माहिती आहेत.

COMMENTS