राज्यभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना ‘हा’ सल्ला !

राज्यभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना ‘हा’ सल्ला !

मुंबई – मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ‘एक पाऊल पुढे, संघर्षांचे’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी काळात राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे याबाबतही जयंत पाटील यांनी माहिती दिली. राज्यातील सर्व नेते, तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी बूथ लेवलवर पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रवादीच्या देश व राज्य पातळीवरील प्रत्येक सेल आणि विभाग प्रमुखाने बूथ लेवलवर पक्षाला बळकटी देण्याचं काम करण्याचा सल्ला यावेळी जयंत पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान भाजपचे मित्रपक्ष असलेल्या काही पक्षांनी फारकत घेतली तर काही नाराज आहेत. अनेक पक्ष सरकारच्या विरोधात बोलायला लागले आहेत. त्यामुळे सरकारात सगळं आलबेल आहे असे मानायचे कारण नाही. त्यामुळे जी आघाडी उत्तम, ज्यांची बांधणी उत्तम ते पुढील काळात सत्तेत येण्याची शक्यता असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच गरीब जनता, सर्वसामान्य यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, आणि दिवसेंदिवस जनतेच्या मनातला रोष वाढत जाईल याबाबत मला शंका नाही. म्हणूनच सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी रस्त्यांवर उतरायला हवे असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराबद्दल सर्वच जाती-धर्मातील आणि सर्व स्तरातील लोकांमध्ये एक असमाधानाची भावना आहे. नरेंद्र मोदी यांच्या बद्दलची लोकभावना बदलायला लागली आहे. आता मोदी सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण अत्यंत गांभीर्याने करायला हवं असंही यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.

COMMENTS