महादेव जानकरांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करतायत, जयंत पाटलांचा दावा!

महादेव जानकरांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करतायत, जयंत पाटलांचा दावा!

सांगली –  महायुतीत नाराज असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. महादेव जानकरांना भाजपने जी वागणूक दिली, ती अपमानजनक आहे. रासपच्या उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म देऊन त्यांना भरायला लावले. त्यावरुन त्यांची मित्रपक्षांशी वागणूक कशी आहे हे दिसून येते. भाजपला रासपने पाठिंबा दिला तो धनगर आरक्षणासाठी. मात्र ते आरक्षणही मिळालं नाही. त्यामुळे रासपलाही हाकलून लावण्याचं षडयंत्र हे भाजपने केलं. म्हणून रासपचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो असं पाटील यांनी म्हटलं आहे. ते सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान जागावाटपात माझ्या पक्षावर अन्याय झाला असून, भाजपने आम्हाला धोका दिला असल्याचं यापूर्वीच जानकर यांनी म्हटले आहे. मी स्वाभिमानी, माझ्यावर अन्याय झाला. मी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होतो. दिल्लीतून माझ्या पक्षासाठी जागाही देण्यात आल्या पण, राज्याच्या कार्यकारिणीत काय झाले कळाले नाही.

मी यावर मुख्यमंत्र्यांना विचारलं, तर त्यांनी याची माहिती नसल्याचं सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनीही पाहतो, असे सांगितले. आज, परभणी जिल्ह्याती?ल गंगाखेडच्या जागेवर रासपचा उमेदवार रिंगणात आहे. महायुतीत ती जागा शिवसेनेकडे आहे. तेथे मैत्रीपूर्ण लढत करून मला सहकार्य करावे, अशी माझी शिवसेना-भाजपला विनंती आहे. आता संयमातून मार्ग काढला पाहिजे, अस म्हणत आपण महायुतीत कायम असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले होते.

परंतु महायुतीत नाराज असलेल्या महादेव जानकर यांच्या रासपचे कार्यकर्ते आघाडीला मदत करत असल्याचा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांच्या दाव्यावर जानकर काय बोलणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS