जालन्यात शिवसेना विरुद्ध भाजप, लोकसभेसाठी यांना उमेदवारी?

जालन्यात शिवसेना विरुद्ध भाजप, लोकसभेसाठी यांना उमेदवारी?

जालना – जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेने कंबर कसल्याचे दिसते आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेन उमेदवार देण्याचं ठरवलं असल्याची माहिती आहे. राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हेच जालना लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असल्याचं  स्वत: अर्जुन खोतकर यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप स्वतंत्र लढवणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा  राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठराव झाला असल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्याच्या सूचना मला दिल्या आहेत. त्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढणार हे जाहीर असल्यचं त्यांनी म्हटलं आहे. उ


द्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागलोय. आता जर समजा शिवसेना-भाजप युती झालीच, तरीही जालन्याची जागा भाजपऐवजी शिवसेनेने लढावं, अशी मागणी मी करणार असल्याचंही अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS