जालना – अर्जून खोतकरांची स्टंटबाजी संपली, दानवे-खोतकरांमध्ये दिलजमाई?

जालना – अर्जून खोतकरांची स्टंटबाजी संपली, दानवे-खोतकरांमध्ये दिलजमाई?

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पुकारलेले बंड अपेक्षेप्रमाणे मागे घेतले आहे. पण, गेले काही दिवस चर्चेच राहणारे खोतकरांनी तलवार म्यान केल्याने स्टंटबांजी होती का? असा प्रश्न
नागरिकांतून विचारला जात आहे. रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. गेल्या पाच वर्षात दोघांमध्ये आडवा विस्तव जात नव्हता. दोघेही एकमेकांवर कुरघोडीची एकही संधी सोडत नव्हते. भाजप-सेनेत युती झाल्यानंतर दानवे शांत झाले. पण, खोतकरांनी मात्र दानवे यांना कायमच आवाहन दिले. वेळप्रसंगी काँग्रेसच्या नेत्यांना भेटून त्यांनी अजूनही मी मैदानात असल्याचे सांगतिले. शिवाय खोतकरांच्या काही समर्थकांनी त्यांनी लढावे, यासाठी घरासमोर चक्क उपोषण केले. त्यामुळे ही स्टंटबाजी तर नव्हती ना, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द मी मानतो, असे सांगतानाच अद्याप मैदान सोडले नसल्याचे ते माध्यमांना सांगत होते.

युती झाल्यानंतर पक्षप्रमुख दानवे यांच्या विरोधात लढा, असा कसा सल्ला देतील. हे सर्वांना कळण्याजोगे आहे. पण, तरीही मैदान न सोडणे. अशी प्रसिद्धीची वाक्य वापरून त्यांनी दानवे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

या कटकारस्थानामागे भाजपमधील एक लॉबी दानवेंच्या विरोधात कार्यरत होती काय, असेही चर्चा होत आहे. याशिवाय खोतकरांनी एक साखर कारखाना अल्प दरात पदरात पाडून घेत, ताणलेला धन्युष्य सैल केला काय, अशीची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे खोतकरांचे बंड, स्टंटबांजी अन आता दिलजमाई असा प्रवास अखेर थंडावला असल्याची चर्चा आहे.

COMMENTS