बाळासाहेब थोरातांविरोधात विधानसभा लढवणार ? निवृत्ती महाराजांनी दिली “ही” प्रतिक्रिया !

बाळासाहेब थोरातांविरोधात विधानसभा लढवणार ? निवृत्ती महाराजांनी दिली “ही” प्रतिक्रिया !

संगमनेर – प्रसिद्ध किर्तनकार ह.ब.प. निवृत्ती महाराज हे परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये संगमनेरमध्ये दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. इंदुरीकर महाराज हे राजकारणात उतरणार आणि ते भाजपमधून निवडणूक लढवणार अशी चर्चा रंगली. संगमनेर हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ. थोरातांना या मतदारसंघात अडकून ठेवण्यासाठी इंदुरीकर महाराजांना निवडणुकीत उरवण्याची चाल भाजपनं खेळल्याची तयारी सुरू झाली होती.

निवृत्ती महाराज इंदुरीकर या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. पुरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा मदतनिधी देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची प्रतिक्रिया इंदुरीकरांनी दिली आहे. राजकारणात जाण्याचा आपला कोणताही उद्देश नाही. समाजकारण सुरू आहे तेच पुढेही चालू ठेवणार आहे असंही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण केवळ तेवढ्यापुरतेच होतो. भाजपमध्ये जायचे असते तर कार्यक्रम संपेपर्यंत त्यांच्यासोबत थांबलो असतो असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.

निवृत्ती महाराज यांचा ग्रामिण भागात मोठा फॅन फॉलोवर आहे. त्यांच्या किर्तनाला ग्रामिण भागात तुफान प्रतिसाद मिळतो. त्यांच्या याच प्रसिद्धीचा उपयोग करुन बाळासाहेब थोरात यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्यासाठी भाजपने आणि विखे पाटील यांनी खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र निवृत्ती महाराजांच्या खुलाशानंतर या चर्चेवर तुर्तास तरी पडदा पडला आहे. मात्र नक्की काय होतं ते पाहण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पहावी लागेल.

COMMENTS