विखे-पवारांच्या युतीने शिंदेंना धक्का

विखे-पवारांच्या युतीने शिंदेंना धक्का

अहमदनगर : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी एकमेकांचे जीवलग मित्र असलेले लोक कधी विरोधक होतील याचा नेम नाही. त्यातचा प्रयत्न हा कोणत्याना कोणत्या निवडणुकीत येत असतो. सध्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकी जाहीर झाली. या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांपासून एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे पवार-विखे-पाटील कुटुंबीयांना युती केली. या युतीमुळे भाजपमध्ये असलेल्या विखेंनी भाजपचे माजी आमदार राम शिंदेंना धक्का दिला.

अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. आमदार रोहित पवारांच्या आदेशानंतर पुढचं नियोजन सुरु झालं. त्यानुसार आता राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
रोहित पवार यांनी सुरेश भोसले यांना अर्ज मागे घ्यायला लावून तसंच ऐनवेळी विखेंशी छुपी युती करुन राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’ दाखवून दिला आहे. यापुढच्या नगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी रोहित पवारांचं हे बेरजेचं राजकारण महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे.

COMMENTS