14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले….

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?, आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले….

मुंबई – 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का नाही याबाबतचा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वत: भाष्य क्लं आहे. लॉकडाऊनबाबत 14 एप्रिलला पंतप्रधान जाहीर करतील. 14 एप्रिल नंतर परिस्थिती नॉरमल होईल असं समजू नका. लोकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. अजून 15 दिवस आहेत. आताच लॉकडाऊन वाढेल की नाही सांगता येणार नाही.14 एप्रिलला लॉकडाऊन मागे घ्यायचा की नाही हा केंद्राचा निर्णय आहे. जर मागे घेतला तर सर्वजण घराबाहेर पडतील आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी पडेल. आपण 14 तारखेपर्यंत वाट बघू, स्वत:ला शिस्त लावू, लॉकडाऊन संपवायचा असेल तर आपण खबरदारी घेण्याची गरज असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन 50 ते 60 दिवसांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ आपल्या देशात तो वाढणार असं मी म्हणणार नाही, तो मला अधिकारही नाही. सध्या आपण शंभर टक्के दुसऱ्याच स्टेजला आहोत. जर समूह संसर्ग असेल तरच तिसरी स्टेज म्हणता येते. समजा धारावीतील 100 जणांना तपासल्यावर 70 पॉझिटिव्ह निघाले तर त्याला तिसरी स्टेज म्हणता येईल. आपण दुसऱ्या स्टेजला आहोत, अन्य देशात समूह संसर्ग झाल्याने तिकडे वेगाने आकडे वाढले असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS