कर्नाटकात आघाडीत बिघाडी, जेडीएसच्या देवेगौडांचा काँग्रेसला इशारा !

कर्नाटकात आघाडीत बिघाडी, जेडीएसच्या देवेगौडांचा काँग्रेसला इशारा !

बंगळुरू – कर्नाटकमधील राजकीय वातावणर सध्या तापत असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच स्थापन केलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारमधील वातावरण सध्या चिघळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या आघाडीत बिघाडी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुमारस्वामींचं सरकार पाडण्याच्या काँग्रेसच्या हालचाली सुरु असल्याच्या वृत्तामुळं जेडीएसचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला इशारा दिला असून ‘प्रादेशिक पक्षांना गृहित धरू नका, असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘कर्नाटकात मतभेद बाजूला ठेवून काँग्रेससोबत लोकसभा निवडणुका लढविण्याचं ठरवलं असल्याचं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. तसेच यावर सविस्तर चर्चा अद्याप व्हायची असून राहुल गांधी आणि कुमारस्वामी यांच्यात होणारी चर्चा काही कारणास्तव झाली नाही. मात्र, काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांना गृहित धरू नये, असं देवेगौडा यांनी म्हटलं आहे. तसेच कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या वेळी सहा पक्षांचं एकत्र येणं ही भाजपविरोधी एकजूट मजबूत असल्याचं निदर्शक होतं. मात्र, २०१९मध्ये प्रत्येक राज्यात या पक्षांनी काँग्रेससोबत निवडणुका लढल्याच पाहिजेत असं नाही असंही यावेळी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS