हर्षवर्धन पाटलांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्का,  ‘या’ नेत्यासोबत तासभर चर्चा ?

हर्षवर्धन पाटलांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्का, ‘या’ नेत्यासोबत तासभर चर्चा ?

पंढरपूर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर जवळपास एक तास मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. तसेच आज हर्षवर्धन पाटील यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यापूर्वी मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यासाठी मोहिते पाटील यांनी पुढाकार घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत काँग्रेसमध्ये अद्याप संभ्रम असल्यामुळे पाटील नाराज आहेत. त्यामुळे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. अशातच आज त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आज ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

तसेच आज हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी विचार विनियम करण्यासाठी संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांची भावना आणि भूमिका जाणून तसंच सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढचा निर्णय घेण्यात येईल’, असं सूचक वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी चार दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे आज ते भाजपमध्ये जाण्याची खोषणा करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

COMMENTS