पुणे पदवीधर मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख विरुद्ध अरुण लाड, राष्ट्रवादीकडून लाड यांना उमेदवारी जाहीर !

पुणे पदवीधर मतदारसंघात संग्रामसिंह देशमुख विरुद्ध अरुण लाड, राष्ट्रवादीकडून लाड यांना उमेदवारी जाहीर !

सांगली – पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड याना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक देखील आहेत. क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी डी बापू लाड यांचे चे पुत्र आहेत. हा मतदारसंघ पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा असला तरी. दोन्ही पक्षांचे उमेदवार सांगली जिल्ह्यातले असल्याने या निवडणुकीची युद्धभूमी ही सांगली जिल्हा असणार आहे.

मागील पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणाऱ्या अरुण अण्णा लाड यांना तब्बल 48 हजार इतकी मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार श्रीरंग पाटील यांना पन्नास हजाराच्या आसपास मतं पडली होती. तर भाजपचे विजयी उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना 52 हजाराच्या आसपास मते पडली होती. अरुणा लाड यांच्या त्या वेळच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी’च्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

या मतदारसंघात अरुण अण्णा लाड यांनी यावेळी सुद्धा जोरदार तयारी केली आहे. यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळणार अशी परिस्थिती असताना. सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव याच मतदारसंघातील भाजपाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघातून अगोदरच उमेदवारी जाहीर केली.

पलूस-कडेगाव मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय संपतराव देशमुख हे दोन गट अनेक वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत आले आहेत. आणि पक्ष कोणते ही असले तरी लाड आणि देशमुख या दोन्ही गटांनी नेहमी प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना मदत केली आहे. मात्र यंदा पहिल्यांदा घराण्यातील उमेदवार एकमेकांच्या थेट समोरासमोर उभे राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

COMMENTS