वंचित बहुजन आघाडीला धक्का, गोपीचंद पडळकर यांनी केली ही घोषणा !

वंचित बहुजन आघाडीला धक्का, गोपीचंद पडळकर यांनी केली ही घोषणा !

सांगली – वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून गोपीचंद पडळकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे काम आजपासून बंद केले आहे. मी राजीनामा दिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार सकारात्मक आहे. पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असून सर्व पक्षांकडून मला ऑफर आहेत असं पडळकर यांनी म्हटलं आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला आहो.

दरम्यान गोपीचंद पडळकर हे भाजपमधून जत किंवा खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना जत मतदारसंघातून 53 हजार तर खानापूर मतदारसंघातून 78 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन जत अथवा खानापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. जतमध्ये विद्यमान भाजपा आमदार विलास जगताप यांच्याविरोधात नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जगताप यांचे तिकीट कापून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे.

COMMENTS