धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी?

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी?

मुंबई – आगामी लोकसभा निडणुकीसाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी पडळकर हे नागपूरमध्ये गेले असून उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून पडळकर यांना उमेदवारी दिली जाणार असून त्यांची  संजयकाका पाटील व विशाल पाटील या दोघांशी लढत होणार आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने सांगलीचे तिकिट जयसिंगतात्या शेंडगे यांना दिले होते. हे तिकिट रद्द करून प्रकाश शेंडगे यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु आता शेंडगे यांच्याऐवजी पडळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीने  पडळकर यांना उमेदवारीची ऑफर दिली होती. पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढवावी असे आवाहन आघाडीच्या नेत्यांनी केले होते. परंचु खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत गोपीचंद पडळकर यांना तिकिट दिले जाण्याची शक्यता होती. पडळकर शेट्टी यांच्या भरवशावर अवलंबून होते. परंतु शेट्टी यांनी आयत्या वेळी पडळकर यांना डावलून विशाल पाटीलांना तिकिट दिले. त्यामुळे आता पडळकर यांनी वंचित बहूजन आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS