जनावरांच्या बाजारातही ‘मोदी’ नावाचा करिष्मा

जनावरांच्या बाजारातही ‘मोदी’ नावाचा करिष्मा

सांगली – देशाच्या राजकारणात २०१४ सालापासून नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसून येत आहेत. भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोदीचा नावाचा वापर करून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक जिंकून सत्ता हस्तगत करीत आहे. ही आयडिया वापरून सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या बकऱ्याला चक्क मोदी नाव दिले. या नावामुळे सोमवारी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या जनावरांच्या बाजारात या बकऱ्याची कोट्यावधी रुपयांची बोली लावली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झालं असल्याने आटपाडीतील जनावरांच्या बाजारालाही मोठा फटका बसला. प्राणी विक्रेत्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला समोरं जावं लागलं. मात्र, आता इथली परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा प्राण्यांची मागणी वाढली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या आटपाडीच्या या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता.

तुम्ही म्हणालं या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे. तर या बकऱ्याचं नाव ‘मोदी’ असं ठेवण्यात आलं असून त्याच्या मालकाने तब्बल दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. खरेदीदारानं त्यांना जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. मात्र, मेतकरी यांना ते मान्य झालं नाही त्यामुळे हा बकरा अद्यापही विकला गेला नाही.

 

COMMENTS