शिक्षक मतदारसंघ निवडणूक – नाशिकमध्ये मतदारांना वाटल्या पैठणी ?

शिक्षक मतदारसंघ निवडणूक – नाशिकमध्ये मतदारांना वाटल्या पैठणी ?

मुंबई  विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. अशातच नाशिक मतदारसंघात उमेदवारांकडून पैठणी आणि पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैठणी वाटल्या जात असून दोन ते पाच हजाराची पाकिटं दिली जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून अशाप्रकारचे गैरव्यवहार थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भगवी पाकिटं येत असल्याचा गंभीर आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला असून एका मतासाठी 5 ते 10 हजाराचा रेट असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सध्या गाजत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS