भाईचंद रायसोनी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत ?

भाईचंद रायसोनी सोसायटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत ?

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीमधील गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याने महाजन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

जळगाव शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली आहे.

खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात तपासणी सुरु केली. याठिकाणी पोलिसांना महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे समजते. यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

COMMENTS