गडचिरोलीतील कसनसूर भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरूंगाचा स्फोट !

गडचिरोलीतील कसनसूर भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणला भूसुरूंगाचा स्फोट !

गडचिरोली – गडचिरोलीतील दुर्गम आणि अतिसंवेदनशील कसनसूर भागात नक्षलवाद्यांनी आज भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला आहे. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कसनसूर पोलीस ठाण्यात हद्दीतील वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास भूसुरूंगाचा स्फोट घडवला आहे. स्फोटात सुदैवाने कुणीही जखमी नाही अथवा कोणतीही हानी नसल्याची माहिती आहे.

दरम्यान वाघेझरी केंद्रावर मतदान सुरु असताना अचानक झालेल्या स्फोटमुळे तेथे उपस्थित मतदार, आणि तैनात असलेल्या पोलीस जवानात खळबळ उडाली आहे. काल गट्टा गावात नक्षलवाद्यांनी स्फोट
घडवून आणला होता, त्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला होता. त्यानंतर आजही स्फोट घडवून आण्ल्यामुळे परिसरात भीतीचं सावट आहे.

COMMENTS