विधानपरिषदेचा अंतिम निकाल, वाचा सविस्तर !

विधानपरिषदेचा अंतिम निकाल, वाचा सविस्तर !

मुंबई – विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदविधर, कोकण पदविधर आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या चारही जागांचा अंतिम निकाल हाती आला आहे. मुंबई पदविधरमध्ये शिवसेनेचे विलास पोतनीस, मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी तिस-यांदा विजय मिळवला आहे. तर कोकण पदविधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला असून नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी बाजी मारली आहे.

दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावल्यामुळे निकालात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं होतं. परंतु या चारपैकी दोन जागांवर शिवसेनेनं बाजी मारली असून भाजपला एकत तर लोकभारतीने एका जागेवर विजय मिळवला आहे. या निवडणुकांसाठी खरी लढत शिवसेना आणि भाजपमध्ये पहायला मिळाली.

 मुंबई शिक्षक मतदारसंघ

 या मतदारसंघात लोकभारतीचे कपील पाटील यांनी तिस-यांदा विजय मिळवला आहे. कपील पाटील यांना 4050 मतं मिळाली आहेत तर शिवसेनेच्या शिवाजी शेंडगे यांना 1736, भाजपचे पुरस्कृत अनिल देशमुख यांना 1124 मतं मिळाली.

मुंबई पदविधर मतदारसंघ

 या मतदारसंघात शिवेसनेने आपला गड कायम राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपचे अमित मेहता यांचा तब्बल 11 हजार 611 मतांनी पराभव केला. विलास पोतनीस यांना 19 हजार 354 मतं मिळाली तर भाजपचे अमितकुमार मेहता यांना 7 हजार 792 मतं मिळाली.

कोकण पदविधर मतदारसंघ निवडणूक

 या मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली आहे. भाजपचे निरंजन डावखरे यांनी 8 हजार 127 मतांनी विजय मिळवला. निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना 24 हजार 704 मतं पडली. तर राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टीचे नजीब मुल्ला हे तिस-या क्रमांकावर राहिले.

नाशिक शिक्षक मतदारसंघ

या मतदारसंघात शिवसेनेने आपला भगवा फडकावला असून शिवसेनेचे किशोर दराडे यांनी दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी बाजी मारली आहे. किशोर दराडे यांना 24 हजार 369 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुरस्कृत टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13 हजार 830 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे अनिकेत पाटील तिस-या क्रमांकावर फेकले गेले.

 

 

 

COMMENTS