पुणे महापालिकेत नगरसेवक हरवल्याचे बॅनर !

पुणे महापालिकेत नगरसेवक हरवल्याचे बॅनर !

पुणे महानरपालिकेमध्ये सध्या नगरसेवक हरवल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रभाग क्रमांक ३३ मधील चव्हाण बागेच्या परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. रोडवर ड्रेनेज मैलापाणी, रस्त्याची प्रचंड दुरावस्था, अपघातांची मालिका सुरू अशा मजकुराचा बॅनर या प्रभागात लावण्यात आला आहे.

या बॅनरवर कोणाचंही नाव लिहिलं गेलं नसून सजग नागरिक असं टाकण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रभागात भेडसवणा-या समस्या आता बॅनरद्वारे नगरसेवकापर्यंत पोहचणार का आणि त्या पोहचल्यातर प्रभागातील भेडसावणा-या समस्या आणि प्रश्नावर काय उपाययोजना केली जाणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS