राज्यातील शेतकय्रांना दिलासा, 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी खात्यावर जमा !

राज्यातील शेतकय्रांना दिलासा, 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी खात्यावर जमा !

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारनं नव्याने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचीच अंमलबजावणी सध्या होत असून राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 31 मार्चअखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून 10 लाख 40 हजार 935 शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 407 कोटी 13 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच व्यापारी बँकांच्या माध्यमातून 8 लाख 48 हजार 593 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार 559 कोटी 80 हजार रजमा केले असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील शेतकय्रांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS