कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी, ‘या’ शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी  !

कर्जमाफीतील महत्त्वाच्या बाबी, ‘या’ शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी !

नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा करण्यात आली. येत्या मार्च 2020 पासून ही शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

या शेतकय्रांना मिळणार कर्जमाफी

1) ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज घेतलं आहे, त्या सर्व शेतकय्रांचं कर्ज माफ होणार आहे.

2) राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.

3) ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचं कर्ज माफ होणार आहे.

4) ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचंच कर्ज माफ होणार आहे.

5) शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी दिली जाणार आहे.

6) कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरण्याची गरज नाही.

7) आधार लिंक असलेल्या थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

8) जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार आहेत.

9) मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी दिली जाणार आहे.

10) मार्च 2020 पासून महात्मा फुले कर्जमाफी योजनेची प्रक्रिया सुरु होणार आहे.

COMMENTS