उद्धव ठाकरे यांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण !

उद्धव ठाकरे यांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण !

वाशिम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांचा अनोखा अंदाज पहावयला मिळाला आहे.उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी नगारा वाजवला असल्याचं पहावयास मिळालं आहे. वाशिममध्ये बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला युतीतील हे दिग्गज नेते एकत्रित आले होते. पोहरा देवी याठिकाणी या नेत्यांच्या हस्ते भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे.

यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्याची आठवण करुन दिली. सेवालाल महाराजांचे देशाच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. सेवालाल स्मारकासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच यावेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना मार्गदर्शक म्हटले आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. राज्याचा गाडा हाकण्याचे सोपे नसल्याचेही यावेळी उद्धव यांनी म्हणत मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

COMMENTS