उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकाच मंचावर टोलेबाजी!

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकाच मंचावर टोलेबाजी!

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज एकाच मंचावर जोरदार टोलेबाजी पहायला मिळाली. हे दोन्ही नेते पुण्यातील बाणेर येथील कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनासाठी एकाच मंचावर आले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं म्हटलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असं म्हणाले. हे ऐकूण बाजूला बसलेल्या अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.

या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनीही जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही येणार आहेत असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजनयुक्त 200 बेडच्या रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी फडणवीस यांनी राज्यात दररोज जवळपास 15 हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. संसर्गाचा दर हा 15 टक्के आहे, हे चिंताजनक आहे. आजही आपला मृत्यूदर हा 3.2 टक्के आहे, जो देशापेक्षा जास्त आहे. टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात टेस्टिंग समाधानकारक असलं तरी मुंबईत टेस्टिंग खूप कमी असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS