…म्हणून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत – शशिकांत शिंदे

…म्हणून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत – शशिकांत शिंदे

मुंबई – राज्यातलं ठाकरे सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लावली जाणार अशी कजबूत राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच कोरोना रोखण्यात ठाकरे सरकराला अपयश आल्याचं सांगत भाजप नेते उठसूठ राज्यपालांच्या दारी जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा राज्यपालांची भेट घेऊन राज्यसरकारच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी देवेंद्र फडणवीस आणि भाजप करत असल्यचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. कोरोनाच्या मुद्यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोध असा सामना रंगला आहे.

याच विषयावरुन राष्ट्रवादीचे नवनिर्माचित आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकार सत्तेवर येऊन 6 महिने होऊन गेले आहेत. विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकूनही फडणवीस आणि भाजप यांना सत्ता मिळवता आली नाही. शिवसेनेशी फाटल्यामुळे त्यांना विरोधात बसावे लागले आहेत. याची बोच त भाजप आणि फडणवीस यांना आहे.

त्याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप सत्तेवर येईल त्यामुळे अऩेक राजकीय नेत्यांना आपल्याकडे ओढून त्यांना विविध आश्वासनं दिली होती. ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतरही सहा महिन्याच्या आत हे सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ असं आश्वासन फडणवीस यांनी अनेक नेत्यांना दिलं होतं. निवडणुकीत अनेकांनाकडून आर्थिक रसद घेतली होती. त्यांनाही सत्तेवर आल्यावर आमक करू तमूक करु अशी आश्वासनं दिली होती. या सर्वांनी फडणवीसांकडं तगादा लावला आहे. त्यामुळे फडणवीस अस्वस्थ झाले आहेत अशी टीका शशिकांत शिंदे यांनी एका वृत्तवाहिनिला बोलताना केली आहे.

सत्ता न मिळाल्यामुळे भाजपमधील अनेक नेते अस्वस्थ आहेत. ते बाहेर पडू शकतात. तसंच भाजपमध्ये फडणवीस यांच्याविरोधात उठाव होऊ शकतो. त्यामुळेही फडणवीस यांची ही अवस्था झाली आहे. त्यामुळेच काहीही करुन हे सरकार अस्थिर करण्याचा प्रय़त्न फडणवीस करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

COMMENTS