शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज दोन माजी आमदारांनी राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.

दरम्यान बळीराम शिरस्कर हे ‘वंचित’च्या तिकिटावर अकोल्यातील बाळापूरमधून आमदार होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. तर अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे यांनीही काही महिन्यांपूर्वी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला होता.त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते
राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने पक्षात प्रवेश केला. राहुल डोंगरे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी वंचितमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

COMMENTS