राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण !

राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण !

लातूर- काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. परंतु पुढील उपचारासाठी त्यांना आज पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कोणाच्या संपर्कात आले नसतानाही कोरोनाचा संसर्ग झाला कसा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या वयातही शिवाजीराव पाटील निलंगेकर हे ग्रामीण भागातील व शहरातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आजही अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे विकासाची कामे घेऊन जातात. परंतु कोरोनामुळे कुटुंबीकडून त्यांना कोणत्याही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जाऊ दिले जात नव्हते. तरीही त्यांना कोरोनाची लागण कशी झाली असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS