भंडारा-गोंदियातील 49 ठिकाणी पार पडलं फेरमतदान !

भंडारा-गोंदियातील 49 ठिकाणी पार पडलं फेरमतदान !

गोंदियागोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीतील 49 ठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात आले. परंतु या मतदानादरम्यानही ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनमध्ये घोळ झाला होता. गोंदिया शहरातील माताटोली येथील मतदान केंद्र 233 वर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला. बटण दाबल्यानंतर 10 मिनिटांनी मतदान होत होतं. सकाळी तास-दीडतासभर हा बिघाड होता, परंतु काही काळानंतर तो दूर करण्यात आला त्यानंतर मतदान सुरळीत पार पडलं आहे.

दरम्यान  28 मे रोजी मतदानावेळी झालेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय फेरमतदान घेण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला . परंतु पुन्हा या मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे या मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या 49 मतदान केंद्रावर फेरमतदान

49 मतदान केंद्रावर मतदान पार पडलं असून या क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली होती.यामध्ये भंडारा विधानसभा मतदारसंघातील 14 केंद्रांवर, साकोली मतदारसंघातील 4 केंद्रांवर, अर्जुनी मोरगावमधील 2, तिरोडातील 8 आणि गोंदियातील 21 मतदान केंद्रांवर फेरमतदान पार पडलं.

28 मे रोजी भंडारा-गोंदियासाठी मतदान झालं, तेव्हा अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होत असल्याचं लक्षात आलं. तसंच काही ठिकाणी मतदान उशीरा सुरु झालं. ज्यामुळे सगळी प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्याची तक्रारही काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दरम्यान मतदानावेळी झालेल्या घोळामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी कादंबरी बलकवडेंची नेमणूक कऱण्यात आली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पार पडलं मतदान 
61-भंडारा विधानसभा- 302- अडयाळ, 320नवेगाव, 318-उमरी, 335-पिंपळगाव, 403-पवनी, 405-पवनी, 374-खैरी दिवाण, 314-पिलांद्री, 317-केसलवाडा,322-पाथरी पुर्नवसन, 362-लोणारा, 363-लोणारा, 428-वलनी, 429-वलनी एकूण 14 केंद्र.62- साकोली विधानसभा-306-पारडी, 316-मुरमाडी, 292-तई बु., 287- घोडेझरी एकूण 4 केंद्र. 63-अर्जुनी मोर विधानसभा-108-बोथली, 159-मानेरी एकूण 2 केंद्र. 64-तिरोडा विधानसभा- 45-अत्री, 97-दवनीवाडा, 102-पिपरटोला, 108-विहीरगाव, 205- भजेपार, 215-पिंडकेपार, 38-मुरदाळा, 52-पालडोंगरी एकूण 8 केंद्र. 65-गोंदिया विधानसभा- 50-सोनपूरी, 78-चारगाव, 94-रतनारा, 115-कामठा, 116-कामठा, 117-कामठा, 123-लांबटोला, 169-गोंदिया, 176A-गोंदिया, 194-गोंदिया, 200-गोंदिया, 206-गोंदिया, 218-गोंदिया, 225-गोंदिया, 233-गोंदिया,240-गोंदिया, 250-गोंदिया, 253-गोंदिया, 271-गोंदिया, 276-गोंदिया, 303 A- फुलचुर एकूण 21 केंद्र असे एकूण 49 मतदान केंद्रावर फेरमतदान होणार आहे.

COMMENTS