या कारणामुळे खडसे आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत

या कारणामुळे खडसे आज ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत

मुंबई : ईडीच्या नोटिसेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दोनच दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने नोटीस पाठवली होती. त्यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावला होता. पंरतु कालपासून खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने ते आज हजर राहू शकत नाहीत,अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पुणे येथील भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी आज (३० डिसेंबर, बुधवार) त्यांना चौकशीसाठी ईडीने मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होत. परंतु कालपासून त्यांना कोरोनाची लक्षण जावू लागल्याने ते आज ईडी कार्यालयात जाणार नाहीत. यासाठी खडसेंनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खडसेंनी कोर्टात सांगितलं आहे की, त्यांना कोरोनाची लक्षण (Covid-19) जाणवत असल्याने ते ईडी कार्यालयात हजर राहू शकत नाही. दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वीच एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागली आहेत.

COMMENTS